2.1.1. पाठ्य पद्धतीतील किकस्टार्ट प्रतिष्ठापन
पूर्वीच्या आवृत्ती नुरूपच किकस्टार्ट द्वारे पाठ्य-पद्धती प्रतिष्ठापन पूर्ण केले जाते. तरी, संकुल निवड, प्रगत विभागणी, व बूटलोडर संयोजना आता पाठ्य पद्धतीत स्वयं नुरूप केल्यामुळे, anaconda तुम्हाला आवश्यक माहिती विचारू शकत नाही. म्हणून किकस्टार्ट फाइल मध्ये संकुल, विभागणी, व बूटलोडर संयोजना पद्धती समावेष केले आहे याची खात्री तुम्ही केली पाहिजे. यापैकी कुठलिही माहिती न आढळल्यास, anaconda त्रुटी संदेशसह बाहेर पडेल.